दोडामार्ग : तळेखोल गावातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर, मा. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनावर आणि युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या संघटन कौशल्यावर ठेवलेला विश्वास या प्रवेशातून स्पष्टपणे दिसून आला.
कोकणात भाजपाचा विस्तार हा केवळ राजकीय घटना नसून, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. “भाजपा हा विचार नाही, ती एक दिशा आहे, राष्ट्रहिताच्या मार्गावर नेणारी दिशा,” असं मत युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी व्यक्त केलं.
या प्रसंगी माजी तालुका अध्यक्ष रंगनाथ गवस, दोडामार्ग शहराध्यक्ष राजेश फुलारी, शंकर फटि गवस, महेंद्र, महादेव गवस, उमेश महादेव गवस, सगुण नकुळ मोरजकर, अक्षय वासुदेव गवस रुपेश लक्ष्मण गवस, विजय लक्ष्मण धर्णे, प्रकाश शशिकांत गवस, सुशांत सुरेश गवस, गुरूदास सदा गवस, लक्ष्मण लाडु धर्णे, गितांजली गुरुदास गवस, शुभम अंकुश गावडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कोकणशाही दोडामार्ग










