
कणकवली : कणकवली-आचरा मार्गावरील एका दवाखान्यासमोरून दुपारच्या वेळेस ४० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली. दही आणण्यासाठी गेलेल्या विद्याधर राजाराम पवार वय – ५७, ( रा. फणसवाडी, वरवडे ) हे मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी परत आल्यावर त्यांना तेथे गाडी दिसली नाही. त्यानंतर त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेत, चोरीची तक्रार दाखल केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
मोटारसायकल पार्क करून दही आणण्यासाठी गेले असता विद्याधर पवार हे दुपारी १२ वाजता कणकवली येथे वैयक्तिक कामासाठी आले होते. त्यांची कामे झाल्यानंतर दुपारी दोन वाजता ते कणकवली ते आचरा रोडवरील डॉ. बिले यांच्या दवाखान्यासमोर थांबले. त्यांनी गाडीला चावी लावून तशीच पार्क केली आणि बाजूच्या दुकानात दही आणण्यासाठी गेले.
दही घेऊन ते परत आले असता, त्यांची मोटारसायकल जागेवर नव्हती. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र ती मिळाली नाही. पवार यांच्या फिर्यादीवरून मोटारसायकल चोरून नेल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. कोकणशाही कणकवली









