
कुडाळ शहर नळयोजनेची मुख्य जलवाहिनी गुरुवारी नक्षत्र टॉवर येथे फुटली. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहरातील कुडाळेश्वरवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, रेल्वेस्थानक मार्ग, पोलीस ठाणे, बाजारपेठ, पानबाजार, नाडकर्णीवाडा, हॉटेल गुलमोहर ते पोस्ट कार्यालय, भैरववाडी, सत्कार पाणंद, माठेवाडा, छत्रपती शिवाजी महाराज नगर, केळबाईवाडी, जुनी व नवीन तुपटवाडी, मस्जिद मोहल्ला, अभिनवनगर १ व २, नवीन नाबरवाडी, पडतेवाडी (आपटे वॉल), गणेशनगर, इंद्रप्रस्थनगर, हिंदू कॉ लनी, जुनी नाबरवाडी औदुंबरनगर या भागातील पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात बंद राहणार आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण होताच या भागातील पाणीपुरवठा कमी-जास्त दाबाने पूर्ववत सुरू करण्यात येईल, याची नळधारकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन न. पं. च्यावतीने करण्यात आले आहे. कोकणशाही कुडाळ









