कुडाळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

कुडाळ : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती (निर्वाचक गण) सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत आज तहसिलदार कार्यलयात जाहीर करण्यात आली. कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण ठरविण्याची ही सोडत प्रक्रिया सार्वजनिक उपस्थितीत व पारदर्शक पद्धतीने पार पडली.
प्रांत ऐश्वर्या काळूशे यांच्या उपस्थितीत तहसीलदार विरसिंग वसावे यांनी एकूण 18 गणासाठी आरक्षण जाहीर केले. अनुसूचित जमातीची लोकसंख्या पुरेशी नसल्याने त्याचे आरक्षण जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे सुरुवातीला पावशी प्रभागापासून सुरुवात करण्यात आली. सर्वात जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या पावशी मध्ये असल्याने आणि गेल्यावेळी सर्वसाधारण अनुसूचित जाती आरक्षण असल्याने यावेळी पावशीला अनुसूचित महिलांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि महिलेसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये आंब्रड, डिगस नागरिकांचा मागास प्रवर्ग, गोठोस आणि घावनळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण पडले आहे. उरलेल्या तेरा गणासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जांभवडे, कसाल, ओरोस बु. तेंडोली, साळगाव, माणगाव, झाराप यांच्यासाठी सर्वसाधारण तर आवळेगाव, वेताळबांबर्डे, नेरूर देऊळवाडा उत्तर, नेरूर देऊळवाडा दक्षिण, पाट, पिंगुळी साठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे.
रणवीर गावडे आणि श्रुष्टी गावडे या शाळकरी मुलांनी आरक्षणाच्या चिठ्या काढल्या. यावेळी यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वीरसिंग वसावे, नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, श्री. गवस आणि कर्मचारी उपस्थित होते. या सोडतीसाठी संबंधित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार तसेच नागरिक उपस्थित होते. कोकणशाही सिंधुदुर्ग कुडाळ