10 वर्षाची गैरसोय आ. निलेश राणेनी चुटकीसरशी केली दूर! राणे पॉवरचा ग्रामस्थांनी घेतला अनुभव

गेली 10 वर्ष रस्त्याअभावी होणारी गैरसोय दूर करत कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी केला रस्ता मोकळा ‌‌

नेरुर जोशीटेंब येथे वाडीत जाण्यासाठी रस्ता नव्हता,ग्रामस्थ गेली 10वर्षे रस्त्यासाठी धडपडत होते आजारी रुग्ण , वयस्कर व्यक्ती, गणपती नेण्यासाठी रस्ता नसल्याने वाडीत राहणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होत होती,तेथील ग्रामस्थानी शासन दरबारी रस्ता होण्यासाठी खुप प्रयत्न केले. व शेवटी कुडाळ मालवण मतदारसंघाचे आ. निलेश राणे यांच्या निदर्शनास आणुन दिली . आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून रस्ता होण्यासाठी शिवसेना विभागप्रमुख श्री संदेश नाईक व श्री रमेश जोशी यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी दिलीप जोशी,मदने गुरुजी,भाई राणे,मामा चव्हाण ,विजय चव्हाण,प्रभाकर गोसावी व ज्यांच्या विशेष सहकार्यामुळे झाले ते मधुकर जोशी उपस्थित होते.सर्व जोशी टेंब ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे आभार मानण्यात आले.