
मुंबई : आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नांतून नवी मुंबई येथे साकार झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते उद्या उदघाटन होत आहे.
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण असणार आहे. या विमानतळाच्या माध्यमातून नवी मुंबई व कोकणासह महाराष्ट्रातील उद्योग, पर्यटन, व्यापार आणि रोजगाराच्या संधींना नवसंजीवनी मिळणार आहे. हे विमानतळ म्हणजे वाहतूक क्षेत्रातील आधुनिकतेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.









