शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी ओंकार तेली, कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, तालुका सचिव राकेश कांदे, तालुका संघटक रोहित भोगटे, युवा सेना शहर प्रमुख माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम यांची निवड

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जाहीर केली निवड

कुडाळ प्रतिनिधी
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शहर प्रमुख पदी नगरसेवक अभिषेक गावडे यांची जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी निवड जाहीर केले तर उपजिल्हाप्रमुख पदी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांची निवड करण्यात आली.
कुडाळ येथे नुकतीच शिवसेनेचे बैठक जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये झाली या बैठकीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये उपजिल्हाप्रमुख पदी ओंकार तेली, कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, तालुका सचिव राकेश कांदे, तालुका संघटक रोहित भोगटे, युवा सेना शहर प्रमुख माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम यांची निवड करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, युवा सेना जिल्हा प्रमुख संग्राम साळसकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रृती वर्दम, रेवती राणे, प्रवक्ते रत्नाकर जोशी, स्वरूप वाळके, चंदन कांबळी, चेतन पडते, देवेंद्र नाईक, राकेश नेमळेकर आदी उपस्थित होते.