गोविंदा पथक ‘जय वेतोबा’ यांना टी-शर्ट व पॅन्ट वाटप

कुडाळ — गोविंदा पथक जय वेतोबा यांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर यांच्या हस्ते नव्या टी-शर्ट व पॅन्टचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पथकातील खेळाडू, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आनंद शिरवलकर यांनी गोविंदा पथकातील खेळाडूंना शुभेच्छा देत परंपरा, संघभावना आणि क्रीडासंस्कृती जपण्याचे आवाहन केले.