भाजपच्या ओरोस मंडल महिला उपाध्यक्षा पदी भारती चव्हाण यांची नियुक्ती

राजेश हेदळकर / ओरोस

भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गची “ओरोस मंडल” कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये श्रीम. भारती विनायक चव्हाण यांची महिला उपाध्यक्षा या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. ओरोस मंडल चे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या सहीने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.