बिबटची शिकार करणाऱ्यांना आरोपीना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

नेरूर तर्फे हवेली मधील गाव मौजे तेंडोली येथील श्री.प्रताप महादेव आरोलकर यांच्या क्षेत्रात बिबट वन्य प्राणी फासकित अडकल्याचे समजल्यावर जागेवर जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी शिकारीच्या उद्देशाने तारेची फासकी लावल्याचे आढळून आले या घटने बाबत आरोलकर यांच्या कडे चौकशी केली असता त्यांच्या आंबा बागायत चे मजूर यांनी सांगितले कि

अनुप सुलेमान टेटे व राशल देवणीस डुंगडुंग यांनी सदरची फसिक ही आपण साळिंदर या वन्यप्राण्याच्या शिकारी करिता लावल्याचे सांगितले , आरोपी यांनी वन्यप्राणी शिकारीच्या उद्देशाने फासकी लावल्याचे कबूल केले, आणि वनगुन्ह्याचा भंग केल्याचे कबूल केले, त्यांनतर आरोपींची झडती घेऊन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांच्या वर गुन्हा नोंदवण्यात आला आहे,
मालकी क्षेत्रात फासकी लावण्याच्या घटना वारंवार निदर्शनास येत असल्याने वनविभागामार्फत सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की आपल्या मालकी क्षेत्रात कोणीही फासकी लावल्याचे आढळल्यास वनविभागास तात्काळ कळवावे.