सावंतवाडी येथे थांबा मंजूर , रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश..

तब्बल दोन वर्षांनंतर थांबा काढून घेतलेल्या नागपूर- मडगाव एक्स्प्रेस या गाडीला सावंतवाडीत रेल्वे स्थानक येथे थांबा देण्यात आला आहे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून या साठी लढा उभारत ही एक्स्प्रेस पुन्हा देण्याची मागणी केली होती त्यानंतर खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नामुळे या मागणीला यश प्राप्त झाले होते, गुरुवारी रेल्वे सावंतवाडी स्थानकात स्वागत करत प्रवासी संघटनेकडून जल्लोष करण्यात आला,
सावंतवाडीत थांबा मिळाल्याने आता सावंतवाडी तालुक्या सह वेंगुर्ले, दोडामार्ग येथील प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे, या वेळी संघटनेच्या प्रयत्नांना पाठबळ देणाऱ्या खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे रेल्वे प्रवासी संघटनेकडून अभर व्यक्त करण्यात आले, विशेष म्हणजे श्री क्षेत्र शेगावला गजनान महाराजांचं दर्शन घेण्यासाठी कोकणवासीयांना या गाडीचा फायदा होणार आहे.

या वेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी चे पदाधिकारी उपाध्यक्ष सागर तळवडेकर,सचिव मिहीर मठकर,नंदू तारी, सुभाष शिरसाट , गोविंद परब, मेहुल रेडिज यांच्या सह सावंतवाडी रिक्षा संघटना पदाधिकारी रेल्वेप्रेमी प्रितेश भागवत आणि नितीन गावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते,