गोव्याहून घरी परतणाऱ्या कर्नाटक येथील पर्यटकांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार तिलारी घाटात १०० फूट दरीत कोसळून अपघात घडला आहे,
हा अपघात आज सकाळी घडला असून या अपघातात कार मधील सर्व जण जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी बेळगाव येथे हलविण्यात आले आहे, याबाबत अधिक माहिती अशी आहे की, गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या कर्नाटक मधील पर्यटक तिलारी घाट मार्गे जात असताना त्यांची कार दगडाला आदळली ही कार आदळल्या नंतर तिथून पुन्हा १०० फूट दरीत कोसळली, या अपघातात जखमींना इतर प्रवाशांनी मदत करत उपचारासाठी बेळगाव येथे हलवण्यात आले आहे ,अपघातस्थळी मोठा रक्तस्त्राव झाला आहे आणि कारचा चक्काचूर झाला आहे.










