कोकणातील राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे गटाचे कोकणातील मोठे नेते मानले जातात. आज स्वत: राजन साळवी यांनी माध्यमांसमोर येऊन या बद्दल माहिती दिली आहे.
“मी ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे. पराभव झाल्याची मोठी खंत, वेदना मला व मतदारसंघातील माझ्या जनतेला आहेत” असं राजन साळवी म्हणाले. “मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतय. पण या सर्व अफवा आहेत. मी निष्ठावंत सैनिक आहे. बाळासाहेबांचाच सैनिक राहणार. या बाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही” असं राजन साळवी म्हणाले.










