आनंदव्हाळ येथे पर्यटकांच्या गाडीला अपघात; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

मालवणहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या कर्नाटक येथील पर्यटकांची कार आनंदव्हाळ येथील मराठी शाळेनजीक रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीला धडकल्याने अपघात झाला. हा अपघात काल सायंकाळी झाला. या कारमधून चार पर्यटक प्रवास करत होते. अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला अडकल्यामुळे मोठा अपघात टळला. मोटार भरधाव वेगात असल्यामुळे गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने आजगावकर यांच्या बागेच्या दगडी कुंपणाला मोटार धडकली.

१०० फुट दगडी कुंपण उडवित जात मोटार एका झाडाला अडकल्याने मोठा अपघात टळला. जेसीबीच्या सहाय्याने मोटार बाहेर काढण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरु होते.