संपूर्ण राज्यात लवकरच धावणार ई-बाईक टॅक्सी….

ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई

हवेतील प्रदूषण कमी करण्यासह अधिकाधिक रोजगार निर्माण करण्याचा हेतू समोर ठेवून राज्यात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परिवहन विभागाकडून त्याविषयीचा प्रस्ताव मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आणि त्यास मान्यता देण्यात आली. एक लाख अथवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ही सेवा येत्या एक-दोन महिन्यांत सुरू केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.

ई-बाईक टॅक्सी सेवेचे फायदे•

*तरुण-तरुणींना रोजगार मिळणार *हवेतील प्रदूषण कमी होणार *वाहतुकीच्या कोंडीतून सुटका • *इच्छितस्थळी लवकर जाता येणार *पार्किंगसाठी कमी जागा लागणार• *प्रवास होणार सुखकर

राज्यात ई-बाईक टॅक्सीलाच परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले की, आतापर्यंत देशातील पहिली ॲप आधारित ई-बाईक टॅक्सी सेवा आसाम देशातील पहिली अॅप आधारित ई-बाईक टॅक्सी सेवा सर्वप्रथम सुरू करण्याचा मान आसामकडे जातो. यंदाच्या ७ जानेवारी रोजी गुवाहाटी येथे देशातील पहिली अॅप आधारित शंभर टक्के इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. त्यासाठी ‘बायु’ नावाचे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे.एकट्या प्रवाशांची गैरसोय होत होती. रिक्षा- टॅक्सीसाठी एका प्रवाशालाही तिप्पट भाडे द्यावे लागत होते. आता ई-बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांची ही गैरसोय दूर होणार आहे. राज्यातील रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या बेरोजगार तरुण-तरुणींना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. तसेच हवेचे प्रदूषण कमी करणे, वाहतुकीच्या कोंडीतून सुटका, वेगवान प्रवास हे अन्य फायदे या व्यवस्थेपनामुळे होणार आहेत.पंधरा किमीची मर्यादा त्यासाठी १५ किमी अंतराची मर्यादा ठेवण्यात आली आहे. ५० बाईक एकत्रपणे घेणाऱ्या संस्थेला अशा प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली जाईल. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही चांगली नियमावली बनवली आहे. दोन प्रवाशांमधील अंतर, पावसाळ्यात प्रवासी भिजू नये यासाठी पूर्ण कव्हर असणाऱ्याच ई- बाईकला सरकार परवानगी देणार आहे. ई-बाईकला प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण राज्य सरकारने निश्चित केले आहे, असेही त्यांनी नमूद केले. प्रवासी भाडे किती असणार? दरम्यान, या ई -बाईक टॅक्सीसाठी प्रवासी भाड्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. प्रवासी भाड्या संदर्भातली नियमावली सरकार तयार करणार आहे. रिक्षात ज्या प्रवासासाठी १०० रुपये लागतात, तो प्रवास ई-बाईक टॅक्सीमध्ये ३० ते ४० रुपयांत कसा होईल त्याबाबत आम्ही नियोजन करत आहोत. येत्या एक ते दोन महिन्यांत ई-टॅक्सी बाईक सुरू होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. रिक्षा महामंडळाच्या सदस्यांना दहा हजारांचे अनुदान मिळणाररिक्षा महामंडळाच्या सदस्य चालकांना १० हजारांचे अनुदान देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रिक्षावाल्याच्या मुलाने किंवा मुलीने ई- बाईक टॅक्सी घेतली तर त्याला किंवा तिला १० हजार रुपयांचे अनुदान सरकार देईल. उर्वरित रक्कम त्यांनी कर्जरूपाने घ्यावी, जेणेकरून त्या मुलाच्या किंवा मुलीच्या खिशात एक रुपयाही नसताना त्याला ई-बाईक टॅक्सी घेता येईल, असेही त्यांनी नमूद केले.आसाममधील स्टार्टअप बिकोझी इकोटेकच्या सहकार्याने आसाम राज्य परिवहन महामंडळाने लाँच केले आहे