सावंतवाडी
कोलगाव – कुंभाळवाडी येथे जंगल परिसरात सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी धाड टाकत चारजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११ हजारांच्या रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई रविवारी रात्री १०.३० वा. च्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली. कोलगाव – कुंभयाळवाडी येथे रोख रकमेसह
११ हजाराच्या नवीन वर्षानिमित्त नाटक सुरू होते. त्याच वेळी कुंभयावळ वाडीतील जंगलात अंदर-बाहर नावाचा जुगार पट सुरू असल्याची माहिती
एलसीबीच्या पोलिसांना समजली. त्यांनी रात्री १०.३० वा. त्या ठिकाणी धाड टाकली. यात राजन गणपत देसाई (४२, रा. माठेवाडा, सावंतवाडी), सुरेश रघुनाथ नार्वेकर (६५, रा. सर्वोदय नगर, सावंतवाडी), मनोज प्रभाकर नाईक (४४, रा. कोलगाव- चव्हाटावाडी) आणि संतोष सहदेव राणे (४४, रा. लाडाची बाग) या चौघांना ताब्यात घेतले. याबाबतची फिर्याद गुन्हा अन्वेषण शाखेचे हवालदार चंद्रकांत पालकर यांनी दिली. या कारवाईदरम्यान काहीजण पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चौघांवरही सावंतवाडी पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. फरारांचा शोध सुरू आहे.










