एप्रिल महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने होणार आहे. मंगळवार, दि. १ एप्रिल ते शुक्रवार, दि. ४ एप्रिलपर्यंत चार दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह वळीव बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज तर तीस जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये ८८ ते ११२ टक्के अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून जूनमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असाही अंदाज व्यक्त केला आहे.
हिमालय ते उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रीय झाला आहे. तामिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील बहुतांश भागात अवकाळी पावसाला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.
हवामान विभागाचा अंदाज असा आहे एप्रिल जून तापमान सरासरीपेक्षा जास्त एप्रिलमध्ये ८८ ते ११२ टक्के अवकाळी पाऊस अलर्ट असे असणार;
जळगाव ऑरेंज अलर्ट पुणे (१, २), सातारा (२), (१), नाशिक (१), अहिल्यानगर (१), छ. संभाजीनगर ( १, २), जालना ( १, २), गोंदिया (२) यलो अलर्ट : ठाणे (१, २), रायगड ( १, २), रत्नागिरी ( १, २), सिंधुदुर्ग (१ ते ४),
असे राहील तीन महिन्यांचे हवामान…
एप्रिल ते जूनमध्ये देशाच्या बहुतेक भागांत सामान्यपेक्षा जास्त तापमान राहील. याच कालावधीत किमान तापमानदेखील सामान्यपेक्षा जास्त राहील. उत्तर आणि पूर्व द्वीपकल्प, मध्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात उष्णतेची तीव्र लाट राहील.
एप्रिलमध्ये पूर्व आणि मध्य भारतातील बहुतेक भागांत सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही पाऊस चांगला राहील..
महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेचे दिवस जास्त राहतील.
एप्रिलमध्ये संपूर्ण देशभरात ३९.२ टक्के इतका पाऊस पडेल. तो दीर्घकालीन सरासरीच्या ८८ ते ११२ टक्के राहण्याची अपेक्षा आहे.










