आनंदाची बातमी;शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू….

ब्युरो न्यूज कोकणशाही

शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू झालीये. ६० प्रवाशांना घेऊन हैदराबादयेथून पहिलेच विमान रविवारी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झाले. विमान दाखल होताच वॉटर सॅल्युट करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचे फुल आणि साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन तसेच केक कापून स्वागत केलंय.