ओरोस :
राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री कक्षामध्ये जनतेच्या भेटीगाठींचा कार्यक्रम आयोजित केला होता खरा, परंतु या कक्षाच्या परिसरात आपले प्रश्न घेऊन येणाऱ्या लोकांची गर्दी खूपच वाढल्यामुळे कार्यक्रमाचे स्थळ बदलून नव्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. गर्दी इतकी मोठी होती की, त्यामुळे या कार्यक्रमाला जनता सिंधुदुर्गनगरी प्रत्येकाशी संवाद साधत, प्रत्येकाचा प्रश्न सोडवत, लोकांचे समाधान करण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी यावेळी केला. यावेळी आपले प्रश्न सुटल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतना. नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.होता. जवळपास एक हजार निवेदने सादर भेटण्यासाठी आले होते. झाल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली. वीज मंडळ, पाणी, रस्ते, पायवाटा, आरोग्य रत्नागिरी जिल्ह्यातून ही काही लोक मंत्री राणे यांना सेवा, नोकरभरती मच्छीमार व बंदर विकासाचे प्रश्न, तलाठी आणि नगररचना विभाग अशा प्रत्येक विभागाच्या हजारो तक्रारींचा पाऊस यावेळी पाहायला मिळाला. जनतेच्या प्रश्नासाठी आपण दर महिन्याला ‘पालकमंत्री दालनात’ उपस्थित रहाणार असल्याचे ना. राणे यांनी सांगितले. गुरूवारी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पालकमंत्री कक्षा’मध्ये ना. नीतेश राणे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी संवाद बैठकीचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी अनिल पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री प्रश्न व समस्या ऐकण्यासाठी हजर रहाणार असल्याने गुरूवारी दुपारपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाभरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यात महिला, तरुणी व ज्येष्ठ नागरिक यांची संख्या अधिक होती. सर्वाधिक प्रश्न व समस्या या महावितरणशी निगडीत आहेत. याशिवाय वाडीवस्तीवरील रस्ते, पायवाटा, आरोग्यसेवा, स्मशानभूमी याबाबतही काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा व जि. प. प्रशासनात अधिकाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. यामुळेही जनतेच्या समस्या प्रलंबित रहात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी या रिक्त जागा भरण्यासाठी आपले प्राधान्य राहील, त्यासाठी आपण मुख्यमंत्री व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही ना. राणे यांनी यावेळी दिली.जनतेला आपले प्रश्न, समस्या थेट मांडता याव्यात, यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र ‘पालकमंत्री कक्ष’ सुरू केला आहे. कक्ष सुरू झाल्यानंतरचा हा पहिलाच संवाद कार्यक्रम होता. जिल्ह्यातील जनतेच्या अनेक समस्या, प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविणे ही प्रशासन प्रमुखांची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे.आज ज्या ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या त्या तक्रारींचे योग्य निरसन करण्याची सूचना संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या सूचनांवर काय कार्यवाही केली याची माहिती पुढील बैठकीत घेतली जाणार आहे, अशी माहिती ना. राणे यांनी दिली. साडेसात वाजेपर्यंत या गाठीभेटी सुरू होत्या. प्रत्येकाच्या समस्या जाणून घेत जनतेच्या प्रश्नांची ऑन द स्पॉट सोडवणूक केली. अनेक तक्रारदारांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना थेट सूचना देत प्रश्न निकाली काढले. काही अधिकाऱ्यांना तर फोनवरुनच थेट सूचना दिल्या अशा पद्धतीने प्रत्येकाचे समाधान होईल अशा पद्धतीचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कामकाज पूर्णत्वास नेले. एकूणच गाठीभेटीनंतर अनेकांनी समाधान व्यक्त केले.काही समस्या त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना देऊन सोडवल्या तर काही समस्या या अधिकाऱ्यांना मुदत देऊन सोडवण्याचे आदेश दिले. एकूणच गाठीभेटींचे स्वरूप व्यक्तीशः जरी असले तरी प्रशासनाला सहभागी करून घेत अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे अशा पद्धतीची सूचना दिली. काही समस्या या शासन निर्णयाप्रत होत्या तर काही समस्या या संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांच्या निर्णय क्षमतेमुळे अडकलेल्या होत्या. या सर्व समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केला.जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर: पालकमंत्री नितेश राणे सामान्य नागरिकाचं प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी’पालकमंत्री कक्ष’ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी आज मी ‘पालकमंत्री कक्षा’त उपलब्ध आहे. यापुढेही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा मी ‘पालकमंत्री कक्षा’त सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध राहणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. पालकमंत्री म्हणून मी जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस या कक्षामध्ये उपलब्ध राहणार आहे. त्याबाबत जनतेला वेळोवेळी कळविण्यात येणार आहे. जेणेकरुन नागरिक आपल्या समस्या घेऊन माझ्याकडे येतील आणि त्यांची प्रलंबित कामे मी पूर्ण करुन देईल. जनतेची कामे अधिक गतीमान पध्दतीने व्हावीत हा या पालकमंत्री कक्ष स्थापने मागचा मुख्य उद्देश असल्याचेही ते म्हणाले.









