रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? मंत्री भरत गोगावले यांची माहिती…

रायगड

सर्वजण रायगडच्या पालकमंत्री पदाची वाट बघत आहेत. पण नेमता तिढा कधी सुटणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत खुद्द मंत्री भरत गोगावले यांनीच माहिती दिली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या अडचणी सुटल्या की पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असे गोगावले म्हणाले. पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल तेव्हा सुटेल असं म्हणत भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत जास्त बोलणं टाळलं.

रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत नेमकं काय म्हणाले भरत गोगावले?आम्ही सर्वचजण याबाबत वाट पहात आहोत. मात्र, वरिष्ठांना सुद्धा काही अडचणी असून त्या सोडवण्याचे काम सुरु आहे. त्या अडचणी मार्गी लागल्यावर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असं म्हणत गोगावले यांनी यावर भाष्य केलं. तर दुसरीकडे काल पार पडलेल्या अलिबाग येथील जिल्हा शांतता कमिटीच्या बैठकीत अनुपस्थिती वर गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. आपण किल्ले रायगडावर गेलो होतो म्हणून तिकडे जायला जमलं नसल्याचं गोगावले म्हणाले. दुसरीकडे चंद्रकांत दादा पाटील सुद्धा आज रायगडच्या नियोजित दौऱ्यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या निवासस्थानी उतरल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. यावर गोगावले बोलताना म्हणाले की, ते माझ्या घरी पाहुणे म्हणून आले आहेत, त्यांचा पाहुणचार करणे हे कोकणकरांच कर्तव्य आहे असे गोगावले म्हणाले.