राज्याच्या अर्थसंकल्पीय 2025 अधिवेशनाचा समारोप…

ब्युरो न्यूज कोकणशाही

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप बुधवार, २६ मार्च रोजी झाला. या अधिवेशनात विरोधकांनी आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकहिताच्या आणि राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर अपेक्षित चर्चा झालेली नाही. तरीही, अधिवेशनादरम्यान सरासरी दररोज ९ तास ५ मिनिटे कामकाज झाले, ही जमेची बाजू ठरली.

भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर चर्चा घेण्यात आली. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही सहभाग घेतला. मात्र, चर्चेच्या वेळी एकमेकांवर संविधानाच्या पायमल्लीचे आरोप करण्याची स्पर्धा दिसून आली. चर्चेच्या उत्तरादाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण केले, ज्याचे शिवसेना (उबाठा) ने कौतुक केले.

अधिवेशनात लाडक्या बहिणींच्या अनुदानाची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, हे आश्वासन पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.पुढील अधिवेशन सोमवार, ३० जून २०२५ पासून सुरू होणार आहे.