ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई
राज्यातील प्रत्येक घरात नळ हे शासनाचे धोरण असून, त्याद्वारे नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, ही शासनाची भूमिका असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली.बोर्डीकर म्हणाल्या, जलजीवन मिशनअंतर्गत राज्यात एकूण ५१ हजार ५६० पाणीपुरवठ्याच्या योजना आहेत. यासाठी सुमारे ३२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. पाणीपुरवठा योजनेच्या १५ टक्के वाढीव दराने निविदा स्वीकारण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील एकूण १ कोटी ४६ लाख ८० हजार कुटुंबांपैकी १ कोटी ३० लाख ७३ हजार कुटुंबीयांना वैयक्तिक नळ जोडणी देण्यात आली आहे.










