कणकवली :
भिरवंडे – खलांतरवाडी येथील अशोक विश्राम सावंत (६१) हे त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट गाडी घेवून सांगवे -माकडतळे येथे फाळये माळरानावर गेले असता तेथील शेडमध्ये गाडी लावल्याच्या कारणावरून मंगेश शांताराम सावंत (३७) याने शिवीगाळ करत अशोक सावंत यांना मारहाण केली. या झटापटीत अशोक सावंत यांची चेन तुटली आणि ती चोरीला गेली. तर शांताराम विश्राम सावंत (६४) यांनी धमकी देत शिवीगाळ केली. याप्रकरणी अशोक सावंत यांच्या तक्रारीवरून मंगेश सावंत आणि शांताराम सावंत (दोन्ही रा. सांगवे-माकडतळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना गुरुवारी रात्री ८.१५ वा. च्या सुमारास घडली. याबाबतअशोक सावंत यांनी दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे, त्यांच्यात आणि संशयित यांच्यात कौटुंबिक वाद आहेत. गुरुवारी रात्री ते सांगवे माकडतळे येथील फाळयेच्या माळरानावर गेले होते. तेथील रिकामी शेडमध्ये त्यांनी आपली गाडी लावली. त्यावेळी मंगेश सावंत हा रिक्षा घेवून तेथे आला आणि त्याने आपल्या शेडमध्ये कोणी गाडी लावली? अशी विचारणा करत गाडी फोडतो असे म्हणत अशोक सावंत यांना शिवीगाळ करून हाताच्या थापटाने मारहाण करून झटापट केली. त्या झटापटीत अशोक सावंत यांची चेन तुटली व ती चोरीला गेली. तर शांताराम सावंत यांनी धमकी देत शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.










