नागपूर राड्याचा मास्टर माईंड च्या घरावर बुलडोझर….

ब्यूरो न्यूज कोकणशाही

नागपूर महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घराला नोटीस बजावण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात नागपूरच्या महाल भागात दोन गटात मोठा राडा झाला होता. या हिंसक संघर्षात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.नागपूर महापालिका फहीम खानच्या निवासस्थानावर हातोडा चालवणार आहे. EWS अंतर्गत एनआयटीने 30 वर्षाच्या भाडेतत्तावावर हे घर त्याच्या परिवाराला दिलं होतं. त्याच्या आईच्या नावावर हे घर आहे. नागपूर महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आज फहीम खानच घर तोडण्याची कारवाई सुरु होणार आहे. यशोदा नगर परिसरात हे घर आहे. याआधी फहीम खानला नागपूर हिंसाचार प्रकरणात अटक झाली आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आहे. आज नागपूर महापालिका कारवाई करु शकते.