ब्युरो न्यूज कोकणशाही
पतीशी भांडण झाल्यानंतर पत्नी थेट हाय व्होल्टेज विजेच्या टॉवरवर चढल्याचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा प्रयागराजमध्ये घडला. बसहरा तरहार येथील वंदना सिंह यांचे पती भोले सिंह यांच्याशी काहीशा कारणावरून भांडण झाले. या संतापातून त्या चक्क घराजवळ असणाऱ्या शेतातील हायटेन्शन वीज टॉवरवर चढल्या. यमुनानगर येथील लालापूर पोलिस ठाणे आवारात ही घटना घडली. जेव्हा गावातील लोकांनी तिला टॉवरवर पाहिले तेव्हा ते भयभीत झाले.पती व अन्य लोकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला; पण तिने टॉवरवरून उतरण्यास नकार दिला. काही तास हा ड्रामा चालल्यानंतर पोलिस व वीज कंपनीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या आवाहनालादेखील वंदना सिंह यांनी जुमानले नाही. शेवटी टॉवरच्या भोवती जाळे लावून दोरीच्या साहाय्याने पोलिसांनी तिला खाली उतरवले. टॉवरवरून खाली उतरल्यानंतरही त्या भोला सिंह यांच्याबरोबर भांडत होत्या. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.










