ब्युरो न्यूज कोकणशाही
दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात कोकण विभाग पहिल्या स्थानी मुंबई प्रथम, तर ठाणे-पालघर जिल्हा दुसऱ्या; पुणे जिल्हा तिसऱ्या स्थानी रायगड मुंबईसह कोकणाने संपूर्ण राज्यात दरडोई जिल्हा उत्पन्नामध्ये राज्यातील सहा महसुली विभागात कोकण विभागाने गेल्या वेळे प्रमाणे यंदाही राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यादीत मुंबई प्रथम तर ठाणे-पालघर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे २०२४- २५ च्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्याचा या यादीत तिसरा क्रमांक आहे.राज्यात सर्वप्रथम असलेल्या कोकण विभागात मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक म्हणजे ४ लाख ५५ हजार ७६७ आहे. कोकण विभागात दुसऱ्या क्रमांकावर मुंबई शेजारील ठाणे-पालघर जिल्ह्यांचे संयुक्त दरडोई उत्पन्न ३ लाख ९० हजार ७२६ इतके आहे. कोकणातील उर्वरित तीन जिल्ह्यांत रायगड जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ३ लाख १५ हजार ६८१ रुपये, रत्नागिरी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न २ लाख ४५ हजार ४२१ रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न २ लाख ७९ हजार ८० आहे. कोकणातील पाचही जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न गत वेळेपेक्षा यंदा वाढले असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.पुणे विभागात कोल्हापूर दुसरा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे विभागात पुणे जिल्हा प्रथम असून त्याचे दरडोई उत्पन्न ३,७४, २५७ रुपये आहे.










