मुंबई – गोवामहामार्गावर कासार्डे – ब्राह्मणवाडी नजीक मेढेदेव वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पर्यटकांची ट्रॅव्हल महामार्गाच्या बाजूच्या जंगलात उलटली. यात हडपसर-पुणे येथील पाच पर्यटक किरकोळ जखमी झाले. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. हा अपघात शनिवारी स. ७ वा च्या सुमारास घडला.पुणे – हडपसर येथे एका कंपनीतकाम करणारे कर्मचारी व त्याचे कासार्डे – ब्राह्मणवाडी नजीक मेढेदेव वळणावरील अपघातग्रस्त ट्रॅव्हलर कुटुंबीय मिळून १८ जण सिंधुदुर्ग, गोवा पर्यटनासाठी ट्रॅव्हलरने निघाले होते. शनिवारी सकाळी ट्रॅव्हलर कासार्डे – ब्राह्मणवाडी नजीक मेढेदेव येथील वळणावर आली असता चालकाला डुलकी आल्याने त्याचा ताबा सुटून ट्रॅव्हलर सरळ गोव्याच्या दिशेने जात असताना दुभाजक व मुंबईकडे जाणारा लेन पार करीत तीस ते चाळीस फूट पुढे महामार्गालगत जंगलात जाऊन उलटली. या दरम्यानसंरक्षककठड्याला न आदळता थेट सरळ जाऊन उभी राहिल्याने मोठी दुर्घटना टळली.या वाहनातील १८ पर्यटक सुखरूप बचावले. यातील अश्विनी गणेश भगत (३८), सचिन नवनाथ चिंचकर (४३), श्रावणी भिमरावबिरादार (२०), दानेश्वरी रमेश टाकवणे (२२), अभिषेक वैभव बाबर (२०) या पाचजणांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना स्थानिकांच्या मदतीने कासार्डे येथील १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. अनिरुद्ध मुद्राळे, चालक रुपेश राणे यांनी नांदगाव आरोग्य केंद्रात दाखल केले.कणकवली ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर सावंत, पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे, पोलिस कॉन्स्टेबल रूपेश गुरव यांनी घटनेचा पंचानामा केला.










