कणकवली :
सध्या शिमगोत्सव सुरू झाला असून या उत्सवात सारेजण व्यस्त आहेत; मात्र गेल्या दोन दिवसांपासून ऐन फाल्गुनात वैशाख वणवा पेटल्याचा अनुभव निसर्ग देत आहे. ढगाळ आणि दमट वातावरणामुळे प्रचंड उष्मा वाढला असून उकाड्याने जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत. तापमानाने ही चाळिशी गाठल्याने
अंगाची लाहीलाही होत आहे. सर्वसाधारणपणे वैशाख वणव्यापासून उन्हाळा तीव्र होतो; मात्र यंदा ऐन फाल्गुनातच कडक उन्हाळ्याचा
अनुभव येत आहे. दमट हवामान
आणि ढगाळ वातावरणामुळे
वातावरण पार बदलून गेले आहे.
झाडांचे पानही हलत नसल्याने
अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळी ११ वा. नंतर सायंकाळी ५ वा. पर्यंत बाहेर फिरणेही मुश्किल झाले आहे. शिमगोत्सवात प्रचंड उकाडा वाढल्याने सारेच त्रस्त झाले आहेत. आठ दिवसापूर्वी प्रचंड ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून दिवसा आणि रात्रीही उकाडा आणि उकाडाच जाणवत आहे. त्यामुळे घामाच्या धारा वाहत असून ऐन फाल्गुनातच वैशाख वणवा पेटल्याचे चित्र आहे. ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त होतआहे.आंबा, काजू उत्पादनाला फटका या तीव्र उन्हाळ्यामुळे पाणी पातळी वेगाने घटत असून जिल्ह्यात टंचाईची समस्या तीव्र होण्याची भीती आहे. त्याच बरोबर या वाढलेल्या तापमानाचा फटका अज्ञोबा, काजू, नारळ, सुपारी या बागायती पिकांबरोबरच जांभूळ, करवंद यासारख्या रानमेव्यालाही बसला आहे. तीव्र उष्णतेमुळे फळगळतीचे प्रमाण वाढले असून आंबा, काजूची फळे कच्च्या अवस्थेतच जळून काळी पडत आहेत. यामुळे आंबा, काजू उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.










