सावंतवाडी :
मळगाव गावातील गावहोळीची अनोखी परंपरा होळीची आगळी वेगळी परंपरा जपणारा गाव म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव. मळगाव गावातील उंच सुवार्डा डोंगराच्या शिखरावर गावची मानाची पहिली होळी उभारली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सुवार्डा डोंगरा शिखराव भगवा निशाण लावून पहिली होळी उभारून मळगाव गावच्या सात दिवसांच्या शिमगोत्सवास उत्साहात सुरुवात करण्यात आली. असंख्य वर्षांपासून चालत आलेली ही अनोखी परंपरा मळगाव गावचे मानकरी व ग्रामस्थ एकोप्याने जोपासत आले आहेत.मळगाव गावातील मानाच्या होळीसह सर्व होळ्या या होळी पौर्णिमेपासून सात दिवसांचा शिमगोत्सव संपल्यावर एका महिन्यानंतर चैत्र पौर्णिमेला होळी तोडण्यात येते. मात्र सुवार्डा डोंगरावरील होळी तोडली जात नाही, पुढील होळी पौर्णिमा येईपर्यंत भगवा निशाण फ ती दिमाखात उभी असते, हे या होळीच खास वैशिष्ट्य आहे. दरवर्षी जुनी होळी विसर्जित केली जाते व नवीन होळी भगवे निशाण लावून उभारली जाते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सकाळी कुळघराकडून तरंगकाठीचे पूजन करून गावचे राऊळ, गावकर (मानकरी) सवाद्य वाजत गाजत येथील वार्डा डोंगरावर गेले. तिथे गेल्यावर होळीसाठी लागणाऱ्या झाडाचे विधिवत पूजन करून ते होळीसाठी तोडण्यात आले. नंतर वाजतगाजत मानकऱ्यांच्या उपस्थितीत होळी सुवार्डा डोंगराच्या शिखरावर आणून तिला सजविण्यात आले. होळी सजविल्यावर तेथेच डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची पहिली होळी उभारण्यात आली.होळी उभारल्यावर होळीसमोर रांगोळी काढून तिची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सामूहिक व नवसाचे गा-हाणे घालण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी होळीला नारळ, पेढे, नवसाचे नारळाचे तोरण ठेवले. नवसाचे गाऱ्हाणे झाल्यावर उपस्थित सर्वांना पेढा व प्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी मळगाव गावची मानाची होळी मळगावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिरासमोर उभारण्यात आली. त्यानंतर गावातील वाडी-वाडीत गुरुवारी होळ्यासावंतवाडी- मळगाव गावात सुवार्डा डोंगरावर उभारण्यात आलेली होळी.उभारण्यात आल्या. मळगाव गावचाशिमगोत्सव दरवर्षी सात दिवस साजरा करण्यात येतो.










