वेंगुर्ले :
शिवसेना सभासद नोंदणी नियोजन बैठकीस उपस्थित सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, सुनील मोरजकर, योगेश तेली व अन्य तालुक्यात ३१ मार्च पर्यंत नवीन एकूण ५ हजार सभासद व वेंगुर्ले शहरात १हजार सभासद नोंदणी करावयाची असून तालुका व ग्रामीण स्तरावरील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबत आतापासूनच सुरुवात करावी, असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी येथे आयोजित बैठकीत केले. वेंगुर्ले तालुक्यात शिवसेना पक्ष वाढी संदर्भात शुक्रवारी सायंकाळी तालुका मध्यवर्ती कार्यालयात मार्गदर्शन बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. वालावलकर बोलत होते. तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवा तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, कोचरा सरपंच योगेश तेली, उपशहरप्रमुख आर एम परब, युवासेना तालुका संघटक विशाल राऊत, उभा दांडा माजी उपसरपंच गणपत केळुस्कर, शाखाप्रमुख प्रकाश मोटे, प्रेमानंद जाधव, तालुका सरचिटणीस सचिन राऊळ, समीर दाभोलकर, विभाग प्रमुख नयन पेडणेकर, विक्रांत विक्रांत डिचोलकर, अरुण घोगळे, युवा शहर संघटक वेदांग पेडणेकर, स्वप्नील होरुमनी आदी उपस्थित होते.सभासद नोंदणी संदर्भात पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली असून पहिल्या टप्प्यात २५०० व दुसऱ्या टप्प्यात २५०० अशी एकूण पाच हजार इतकी सभासद नोंदणी संपूर्ण तालुक्यात करावयाची आहे. तसेच शहरात शिवसेना बैठकीत नियोजन१००० सभासदचे उद्दिष्ट आहे. दिनांक २१ मार्च रोजी सायं. ५.३० वा. शहरातून रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शिवसेना शाखाप्रमुख आप्पा मांजरेकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.बेरोजगारांनी संधीचा फायदा घ्यावा मांजरेकरपर्यटन वाढी संदर्भात व रोजगार उपलब्धतेसाठी शिवसेनेमार्फत आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असून २२ मार्च पर्यंत फिरते विक्री केंद्र व टुरिस्ट गाडी खरेदीसाठी १५ ते ३५ टक्के शासकीय अनुदान मिळणार आहे.याबाबत सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, सुनील मोरजकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नितीन मांजरेकर यांनी यावेळी केले. यासाठी विविध आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सावंतवाडी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.










