दुसऱ्यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचून बोलणारे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे नाहीत. पोटात एक आणि ओठात एक अशीही कधी त्यांची भूमिका नसते. वास्तव आहे ते त्यांच्या स्थायी स्वभावप्रमाणे जनतेत जाऊन परखडपणे मांडतात. राजकीयदृष्टया अडगळीत पडलेले व ज्यांनी राजकीय हयात जी… जी… करत ऍडजेस्टमेन्ट च केली त्या माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्यावर पूर्वग्रह दूषित हेतूने टीका करू नये असा इशारा माजी समाजकल्याण सभापती तथा जिल्हा भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी दिला आहे.
माजी आमदार उपरकर यांनी पालकमंत्री राणे यांच्यावर टीका केली होती त्याला माजी समाजकल्याण सभापती तथा जिल्हा भाजपा प्रवक्ते जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
जाधव म्हणाले की, येथील जनतेने नेहमीच राणे परिवार यांचे वर विश्वास टाकला आहे. विरोधकांनी खालच्या पातळीवर टीका केली अगदी टोकाचा विरोधही केला मात्र राणे परिवाराच राजकारण जनतेच्या विकासासाठी आहे हा विश्वास लोकांना आहे. म्हणून जनतेने माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांना खासदार, निलेशजी राणे यांना आमदार आणि नितेशजी राणे यांना आमदार मंत्री आणि पालकमंत्री असं धवल यश मिळवून दिल आहे. उपरकर तुम्ही विकास प्रश्नावर बोलत असाल तर तुम्ही आमदार जिल्ह्यात किती विकास कामे केलात. शासनाकडून कोणता व किती निधी जिल्ह्यात खेचून आणलात. आमदार निधीच सांगू नका हं तो निधी प्रत्येक आमदार च्या हक्काचा असतो. उपलब्ध माहिती नुसार तुम्ही बऱ्याच गावात ऍडजेस्ट करत विकास कामांचे दिवे लावलेत. तीही माहिती आहे. त्यामुळे निधीची आकडेवारी द्याचं तुम्ही. दुसरी गोष्ट अशी नामदार राणे यांच्यावर पूर्वग्रह दूषित हेतूने टीका करू नका. पालकमंत्री होऊन वर्ष ही झालं नाही त्यांना. विकास कामे आणि निधी आणण्यासाठी ते कुठेही कमी पडणार नाहीत. त्यांची झलक आताच पहायला मिळत आहे. त्यांच्या झंझावता मुळे उपरकर आणि तुमची द्वेष करणारी मंडळी गलीतगात्र झाली आहे. जनतेने उपरकर तुमच्या टीमला नाकारलं आहे. लोकांचा भारतीय जनता पार्टी आणि राणे परिवार यांच्यावरच विश्वास आहे. उगाचच तुम्ही जिल्ह्यात होऊ घातलेला विकासाला अपशकून करू नका. पालकमंत्री राणे यांच्यावर टीका करण्यात व्यर्थ वेळ घालवीण्यापेक्षा जिल्ह्यात उबाठा पक्ष वाढवा, शाखा काढा, जनसपंर्क वाढावा. ही कामे करा उपरकर. बसून प्रेस घेऊन पक्ष संघटना वाढत नाही. हे माझ्या सारख्या लहान कार्यकर्त्याने तुम्हाला शिकवू नये.
उपरकर तुम्ही म्हणतात मुस्लिम लोकांचा पक्ष प्रवेश का घेतात.प्रवेश घेऊ नका असं तुम्ही म्हणतात,हे तुमचं केविलवाणी धडपड,हतबलता बघून वाईट वाटत. राष्ट्रप्रेमी जो असेल तो आपलाच वाटतो मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो. राष्ट्रप्रेमी जे मुस्लिम असतील त्यांचा बाबत कठोर भूमिका नाहीच आहे त्यांची.मात्र आपल्या देशात राहून देश विरोधी भूमिका घेतात त्यांच्या विरोधात आपण आहोत अशी पालकमंत्री राणे यांची भूमीका आहे.आणि याचं त्यांच्या भूमिकेला राज्यात वाढता पाठिंबा मिळत आहे.उपरकर तुम्ही यांचे जाहीर कौतुक करायला हवे होते मात्र ती दानत तुमच्यात नाही.कुठे काय मिळत अशीच तुमची भूमिका जिल्हावासियांना माहिती आहे.आणि तुमच्याकढून अपेक्षाही नाहीत.नामदार राणे यांनी सत्तेत नसताना आणि आता सत्तेत असताना कसा विकास करायचा,विकासनिधी कसा खेचून आणायचा हे जनतेने जवळून पाहिले आहे.त्यामुळे त्यांच्या आणि भाजपा महायुतीच्या माध्यमातून स्वप्नवत होऊ घातलेल्या विकासाला दृष्ट लावून अपशकून करू नका.बाकी तुम्ही करत असलेल्या राजकीय जी.. जी.. ला जिल्हावासियांचा आक्षेप नाही.मात्र आमच्या नेत्यांवर टीका केल्यास लोकशाही मार्गाने शिस्तीत वस्त्रहरण केलं जाईल असा इशारा माजी समाजकल्याण सभापती तथा जिल्हा भाजपा प्रवक्ते जाधव यांनी दिला आहे.










