पाणीपुरवठा चार दिवस बंद ; पाणी विकत घेण्याची वेळ ; नागरिकांमधून तीव्र संताप

जामसंडे येथील पाईपलाईन वारंवार फुटण्याच्या घटना घडत असून चार ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने देवगड-जामसंडे शहरांचा पाणीपुरवठा गेले चार दिवस बंद आहे. यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
दहिबांव पंप हाऊस येथिल स्टार्टरची कॉईल जळणे, जलवाहिनी वरचेवर फुटणे यामुळे पाणीपुरवठा बंद राहण्याचे प्रकार वारंवार घडत असून अद्यापही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासन यांच्याकडून नळयोजना सक्षम करण्याबाबत हालचाल होत नसल्याने देवगड-जामसंडेवासियांना वारंवार कृत्रिम टंचाईलासामोर जावे लागत आहे. शिवाय पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे
नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पाणी योजनेच्या जलवाहिनीची गंभीर अवस्था आहे. पंप दोन तर मोटर एक अशी स्थिती यामुळे पंपीग यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर पाणीपुरवठा बंद राहण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. दहिबांव वरून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची अशी गंभीर स्थिती असताना मात्र सद्यस्थितीत देवगड- जामसंडे शहरवासियांना पाणीपुरवठा करणारी योजना सक्षम करणे गरजेचे आहे. या नळयोजनेच्या दुरूस्ती व सुधारणा करण्याचा कामासाठी ९ कोटी २१ लाख रकमेची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे. मात्र नळयोजनेची सद्यस्थिती पाहता दुरूस्ती व सुधारणा करण्याचे काम पुढील दहिबांव जलवाहिनी फुटल्याने प्रक्रिया पुर्ण होवून लवकरात लवकर पाणीपुरवठा बंद आहे. होणेही तितकेच गरजेचे आहे.जलवाहीनी फुटल्याने देवगड-