महाकवी कुसुमाग्रज जयंती तथा मराठी भाषा गौरव दिन दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे सचिव डॉ. अरुण गोडकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा

पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाद्वारे महाकवी कुसुमाग्रज जयंती तथा मराठी भाषा गौरव दिन दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे सचिव डॉ. अरुण गोडकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. याप्रसंगी वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव श्री. सुधाकर वळंजू प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. श्री . सुधाकर वळंजू व डॉ.अरुण गोडकर यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “जो माणूस मातृभाषेवर मनापासून प्रेम करतो तो अन्य भाषाही सहज अवगत करू शकतो” असे प्रतिपादन श्री वळंजु यांनी यावेळी केले. सचिव डॉ. अरुण गोडकर यांनीही मराठी भाषा दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयीन समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .या स्पर्धेत महाविद्यालयाच्या एसवाय बिबीआय वर्गाच्या समूहाने प्रथम क्रमांक , एफवाय आयटी वर्गाच्या समूहाने द्वितीय क्रमांक टीवाय बीबी आय वर्गाच्या समूहाने तृतीय क्रमांक पटकाविला तर एसवाय आयटी वर्गाच्या समूहाला उत्तेजनार्थ म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. प्रथमेश गोसावी, प्रा. श्वेता सुतार यांनी काम पाहिले. याप्रसंगी ग्रंथपाल श्री सुशांत वालावलकर, ग्रंथालय समिती सदस्य प्रा. प्रथमेश गोसावी, प्रा.स्मिता परब,प्रा. तन्वी सिंघन, प्रा. हर्षदा लातये,प्रा. प्रांजना पारकर, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथपाल सुशांत वालावलकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रा.श्रुती कोदे यांनी प्रास्ताविक केले . सूत्रसंचालन कुमारी रिया कदम हिने केले तर कु. तन्वी मेस्त्री हिने उपस्थितांचे आभार मानले.