कणकवली –
जळकेवाडी येथील ऋषीकेश विजय मालपेकर (३०) या तरुणाने गुरुवारी दुपारी २.३० वा च्या सुमारास विष प्राशन केल्यानंतर आपल्या मित्राला दवाखान्यात नेण्यास सांगितले. त्यानंतर मित्राने त्याला कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी ८ वा. च्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. ऋषीकेश याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, ऋषीकेश याचे कणकवलीत आइस्क्रिम पार्लर आहे. तो टेम्पोही चालवत असे. ऋषीकेश मालपेकर गुरुवारी दुपारी १२ वा. घरात आईला आपण तळेरे येथे जातो असे सांगून निघून गेला. त्यानंतर दुपारी २.३० वा. त्याचा मित्र उत्तम पुजारे याला त्याने आपण सावडाव येथे असून विष प्राशन केल्याचे सांगितले. त्यानंतर उत्तम पुजारे याने तेथे जाऊन ऋषीकेशला उपचारासाठी कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्याचे निधन झाले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबतची खबर त्याचा भाऊ किरण मालपेकर याने दिली. त्याच्या पश्चात आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे.









