कणकवली, ता. २४ :
घोणसरी येथील बांधकाम व्यावसायिक संजय जगन्नाथ पडवळ यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून फोंडाघाट येथील अजित राधाकृष्ण नाडकर्णी, दत्ताजी सुरेश चव्हाण यांची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. अजित नाडकर्णी यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत तर दत्ताजी चव्हाण यांच्यावतीने अभिरक्षक अॅड उल्का पावस्कर यांनी काम पाहिले.१२ एप्रिल २०१५ दु. ३ वा. च्या सुमारास साक्षीदार गीतेश फोंडके याच्यासोबत नवीन कुर्ली वसाहत येथे बांधकाम पाहणी करण्यासाठी संजय पडवळ गेले होते. त्यानंतर वैभववाडी येथे जाण्यासाठी साक्षीदाराची दुचाकी घेऊन ते निघून गेले व पुन्हा घरी आले नाहीत. दि. १३ एप्रिल रोजी त्यांचा मृतदेह नवीन कुर्ली वसाहतीजवळील एका विहीरीनजिक झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेनंतर १४ दिवसांनी मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे आकस्मिक मृत्यूचा तपास झाला. तपासात सन २०२२ मध्ये चिठ्ठीतील हस्ताक्षर हे मयताचे असल्याचा अहवाल आल्याने चिठ्ठीत उल्लेख असलेल्या अजित नाडकर्णी, शंकर बांबरकर व दत्ताजी चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यात अजित नाडकर्णी यांनी अटकपूर्व जामीन मिळविला होता. तर दरम्यानच्या कालावधीत शंकर बांबरकर यांचा मृत्यू झाला होता.सुनावणीत नऊ साक्षीदार तपासण्यात आले. चिठ्ठीबाब निर्माण झालेला संशय, साक्षीदारांच्या साक्षीतील तफावता असल्याचा अहवाल आल्याने चिठ्ठीत उल्लेख असलेल्या अजित नाडकर्णी, शंकर बांबरकर व दत्ताजी चव्हाण यांच्यावर गुन्हादाखल झाला. यात अजित नाडकर्णी यांनी अटकपूर्व जामीन मिळविला होता. तर दरम्यानच्या कालावधीत शंकर बांबरकर यांचा मृत्यू झाला होता.सुनावणीत नऊ साक्षीदार तपासण्यात आले. चिठ्ठीबाबत निर्माण झालेला संशय, साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, बांधकाम व्यवसायातील कर्जबाजारीपणामुळे मयताला आलेली वैफल्यग्रस्तता, मयताच्या मोबाईलमधील शेवटपर्यंत न सापडलेले सिमकार्ड आदी संशयास्पद बाबींमुळे आरोपींचीनिर्दोष मुक्तता करण्यात आली.










