सिंधुदुर्गनगरी, ता. २४ :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्यांच्या विरोधात गगनभेदी घोषणा दिल्या. तसेच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या भक्तांनी वडेट्टीवार यांच्या छायाचित्र असलेल्या फलकाला जोडामारो करत फलक पायदळी तुडवत तीव्र निषेध केला.काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच जगद्गुरु श्रीनरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं होत. त्यामुळे महाराजांचे शिष्य आणि अनुयायांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आ. वडेट्टीवार यांच्या विरोधात राज्यभर पडसाद उमटत असून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जगतगुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ जिल्हा सेवा समितीच्या वतीने सिंधुदुर्गनगरी बस स्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी समितीचे पीठ प्रमुख सुदिन तेंडोलकर, जिल्हाध्यक्ष दिनेश मुंबरकर, दीपक खराडे, संग्राम सैनिक यांच्यासह महाराजांचे शिष्य आणि अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना देण्यात आले.जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अनुयायांमध्ये मोठा संताप पसरला आहे. या वक्तव्याचा निषेध करत संतप्त अनुयायांनी वडेट्टीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.घोषणाबाजीने परिसर दणानलाआंदोलनकर्त्यांनी आ. वडेट्टीवार यांच्या विरोधात तीव्र शब्दात घोषणा देत परिसर दणानुन सोडला. यावेळी विजय वडेट्टीवार मुडदाबाद च्या घोषणा देत संताप व्यक्त केला.अनेकांनी पोस्टर फा डून संताप व्यक्त केला .तसेच आंदोलनाच्या वेळी विजय वडेंटीवार यांचा फोटो असलेल्या बॅनरवर जोडे मारून आणि हे बॅनर पायदळी तुडवतआंदोलकांनी आपल्या निषेध व्यक्त केला.










