मद्यधुंद अवस्थेत चार गाड्या ठोकणाऱ्या युवकाला दंड…

सावंतवाडी, ता.२४:

मद्यधुंद अवस्थेत चार गाड्या ठोकणाऱ्या आजरा येथील नितेश पांडुरंग ठाकूर याला आज येथील न्यायालयाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. रात्री उशिरा त्याच्यावर सावंतवाडी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. काल रात्री सावंतवाडी बाजारपेठेत भरधाव वेगाने चारगाड्यांना ठोकून पळून जाण्याचा प्रयत्नात असताना त्याला बस स्थानक परिसरात नागरिकांनी ताब्यात घेतली होती. उशिरा त्याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १० हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यातून देण्यातआली.