Category बातम्या

वालोपेत भरधाव टँकरचा कहर; ४ वर्षीय चिमुकली ठार, महामार्गावर संतप्तांचा रास्ता रोको

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (२४ मे) रात्री झालेल्या भीषण अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडल्याने दोन्ही बाजूंना…

घाटीवडे-बांबर्डे मार्गावर चिखलाचे साम्राज्य; नागरिकांचा संताप अनावर

दोडामार्ग : तिलारी-वीजघर राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू असले, तरी हे काम नियमानुसार आणि दर्जेदार होत आहे का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पावसाळा तोंडावर आला तरी ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला आहे. परिणामी वळवाच्या एका सरीनेच या राज्य…

“इन्सुलीत ‘ओंकार’ हत्तीचा धुमाकूळ; हल्ल्यात म्हैस ठार, वासरू गंभीर जखमी!”

बांदा : इन्सुली आणि वाफोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या ‘ओंकार’ हत्तीने आता पाळीव प्राण्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इन्सुली-कुडव टेंब येथील एका बागेत बांधून ठेवलेल्या म्हशीवर हत्तीने जीवघेणा हल्ला करत तिला ठार केले, तर तिच्या वासराला गंभीर…

देवगडात पहिल्याच पावसात रस्ते चिखलमय, गटारे तुंबली; नागरिक त्रस्त ; मान्सूनपूर्व पावसाची एंट्री धडाक्यात

देवगड तालुक्यात रविवारी पहाटे साडेतीन वाजल्यानंतर विजांचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पहिल्याचपावसाने देवगड व जामसंडे शहरातील अपूर्ण, दुर्लक्षित आणि निकृष्ट दर्जाच्या विकासकामांचा फज्जा उडविला. काही भागात गटारांची साफसफाई न झाल्याने अनेक भागांत पाणी साचले. तर मोठ्या प्रमाणावर गाळ रस्त्यावर…

हरित जहाज पुनर्वापरासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक; पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश

जहाज पुर्नावापरा संदर्भात श्री राम हरित जहाज पुनर्वापर उद्योग (युनिट-२) एलएलपी या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी बैठक आयोजित केलीराज्यातील वापरात नसलेल्या बोटी आणि जहाजांच्या पुनर्वापरासाठी सक्षम यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे.…

“नेरळमध्ये हिंदू एकतेचा विराट हुंकार; पालकमंत्री नितेश राणेंचे समाजाला संघटित होण्याचे आवाहन”

सकल हिंदू समाज, नेरळ मंडळ आयोजित विराट हिंदू संमेलनाला मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी उपस्थित राहून हिंदू बांधवांना संबोधित करण्याची संधी लाभली.नेरळसारख्या ठिकाणी हिंदू एकतेची ताकद अधिक भक्कम व्हावी, यासाठी हिंदू समाजाने संघटित होणे अत्यंत आवश्यक…

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे दोडामार्ग येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

दोडामार्ग : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने रविवार, २४ मे रोजी दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेला भव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा…

वनविभागाची मोठी कारवाई; २९ घनमीटर खैर लाकूड जप्त, चालक गाडी टाकून पसार

सावंतवाडी : येथील वनविभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून खैर लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे १२ ते १४ लाख रुपये किमतीचा २९ घनमीटर खैराचा साठा जप्त करण्यात आला आहे. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे लाकूड तस्करांचे…

नागपूर-मडगांव एक्स्प्रेसला कायमस्वरूपी हिरवा कंदील; रेल्वे बोर्डाची मंजुरी

नागपूर जंक्शन ते मडगांव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या ०११३९/४० नागपूर मडगांव विशेष एक्स्प्रेसला नियमित करण्याची मंजुरी रेल्वे बोर्डाकडून देण्यात आली आहे. ही गाडी आता ११२०३/०४ नागपूर मडगांव रेल्वेगाडी म्हणून नियमित दर्जेने धावणार आहे.या गाडीचे वेळापत्रक असे असेलनागपूर जंक्शन ते मडगांव (गोवा):…

पराभवाच्या काळातही साथ कायम; आ. निलेश राणेंनी मानले सहकाऱ्यांचे ऋण

आमदार निलेश राणेंच्या राजापूर रत्नागिरी दौऱ्याच्या निमित्ताने रत्नागिरीचे सहकारी माझ्या कुटुंबाचा एक भाग आहेत. आ. निलेश राणे अनेक दिवसानंतर सगळ्यांना एकत्र भेटले .आमदार निलेश राणे सांगतात, आम्ही कोणत्याही पदावर असलो काय आणि नसलो काय या लोकांना कधी फरक पडला नाही,…