Category बातम्या

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला मंत्री नितेश राणेंची गती; जिल्हानिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा!

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आज मत्स्यव्यवसाय विभागाच्या सर्व प्रादेशिक उपयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांकडून जिल्हानिहाय योजनेच्या प्रगतीचा मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रत्येक जिल्ह्यानुसार योजनेची सद्यस्थिती,…

कोकणच्या आरोग्य सुविधांसाठी मंत्रालयात महत्त्वाची बैठक; राणे बंधूंचा पुढाकार!

मुंबई : मुंबईतील मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसनजी मुश्रीफ यांच्या दालनात आयोजित बैठकीत कोकणातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर आमदार निलेश राणे तसेच मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना उत्तम…

कुडाळ महिला व बाल रुग्णालयात प्रशासन ‘अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांची अचानक पाहणी!

कुडाळ : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन सज्जतेचा सविस्तर आढावा घेतला. तसेच रुग्णालयाच्या आवारात नव्याने स्थलांतरित करण्यात आलेल्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाचीही…

तुमची कल्पना, तुमची सजावट आणि आकर्षक बक्षिसे; गणेशभक्तांसाठी सुवर्णसंधी!

वेंगुर्ले शिवसेनेतर्फे घरगुती गणेश सजावट स्पर्धा. वेंगुर्ले : गणेश चतुर्थीचे औचित्य साधून वेंगुर्ले शिवसेनेतर्फे शहर मर्यादित घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन तालुकाप्रमुख बाळा दळवी व…

🚨 वेताळ बांबर्डेत वन्यजीव बचाव मोहीम यशस्वी; ९ फुटी अजगराला जीवदान!

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे-देऊळवाडी येथे घराच्या आवारात आढळून आलेल्या तब्बल ९ फूट लांबीच्या अजगराला वनविभागाच्या आरआरटी पथकाने शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडून जीवदान दिले. बुधवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास ही घटना घडली वेताळ बांबर्डे-देऊळवाडी येथील रहिवासी…

वैभव नाईकांवर राकेश नेमळेकरांचा घणाघात । 10 वर्षांच्या अपयशामुळेच जनतेने घरी बसवलं ।

कुडाळ : दहा वर्षे जनतेने आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, सत्ता दिली, अधिकार दिले; मात्र त्या दहा वर्षांत मतदारसंघाचा कायापालट करण्याऐवजी आता सत्ता गेल्यानंतर दुसऱ्यांनी सुरू केलेल्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची धडपड सुरू आहे. दहा वर्षे आमदार असताना विकास…

🟧 कणकवली पंचायत समिती चा १ सप्टेंबरला जनता दरबार

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी कणकवली पंचायत समितीतर्फे १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. हा जनता दरबार…

आरोंद्यात रस्त्यावर गुरांचा धुमाकूळ; अपघाताला खुले आमंत्रण!

सावंतवाडी : आरोंदा परिसरात सध्या मोकाट गुरांचा वावर वाढल्याने वाहनधारकांसाठी धोका निर्माण झाला आहे. ही गुरे दिवसा रस्त्यावर फिरताना तसेच रस्त्यावरच बसून राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली गुरे वाहनधारकांच्या सहज लक्षात येत नसल्याने अपघाताची…

अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी शशिकांत इंगळे यांची बिनविरोध निवड! । Kokanshahi ।

देवगड : अखिल भारतीय गोंधळी समाज राष्ट्रीय अध्यक्ष श्री.राजेंद्रजी वनारसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच कोकण विभागीय अध्यक्ष श्री. रमेश गोंधळी यांनी त्यांच्या निवास्थानी बैठकीचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली त्यावेळी…

बालघरातील चिमुकल्यांना हॉटेलमध्ये स्नेहभोजन; शैक्षणिक साहित्याचीही भेट

अहिल्यानगर : बालघरातील मुलांना त्यांच्या नेहमीच्या निवासाच्या वातावरणापेक्षा वेगळे ठिकाण पाहता यावे, त्यांना काही काळ आनंदाचे क्षण अनुभवता यावेत आणि इतर मुलांप्रमाणे हॉटेलमध्ये भोजनाचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशन, कृष्णाली फाऊंडेशन आणि हॉटेल शिंदेशाही यांच्या संयुक्त विद्यमाने…