सावंतवाडी : आरोंदा परिसरात सध्या मोकाट गुरांचा वावर वाढल्याने वाहनधारकांसाठी धोका निर्माण झाला आहे. ही गुरे दिवसा रस्त्यावर फिरताना तसेच रस्त्यावरच बसून राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली गुरे वाहनधारकांच्या सहज लक्षात येत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. अचानक गुरे वाहनाच्या समोर आल्यास वाहनधारकांना वाहनावर नियंत्रण ठेवणेही कठीण होऊ शकते. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे.
या समस्येकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून होत आहे. भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.












