देवगड : अखिल भारतीय गोंधळी समाज राष्ट्रीय अध्यक्ष श्री.राजेंद्रजी वनारसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच कोकण विभागीय अध्यक्ष श्री. रमेश गोंधळी यांनी त्यांच्या निवास्थानी बैठकीचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश प्रवक्ते श्री. संभाजी खाडे प्रदेश कार्यकरणी सदस्य श्री.सुभाष जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पदी श्री तुकाराम भीमराव जोशी यांची निवड करण्यात, आणि महाराष्ट्र संघटक पदी श्री सौरभ दिनेश माने तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून श्री सागर भिसे यांची निवड करण्यात आली त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. अंबादास देविदास इंगळे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी ते म्हणाले जर गोंधळी समाजाचे उज्वल भविष्य बघायचे असेल तर समाजाची एकजुट ही महत्वाची आहे त्यामुळे सर्वांनी एकत्रित येत समाजाला सहकार्य करावे तर श्री संतोष अपन्ना कांबळे सर यांनी समाजाने संघटित होऊन शासन दरबारी न्याय मागणे गरजेचे आहे त्यासाठी समाजाचे एकजूट महत्वाचे आहे असे सांगितले तर जिल्हा अध्यक्ष श्री. शशिकांत इंगळे यांनी गोंधळी समाजाला शैक्षणिक,आर्थिक,व भौगोलिक,दृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर तरुणांनी एकत्र येणे गरजेचे आहे गोंधळी समाज हा अजूनही आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे ही खूप वाईट बाब आहे तसेच समाजातील समाज बांधवानी पोटाची खळगी करून मुलांना शिक्षण देऊनही . मुलांसोबत नोकरीचे संकट आहे यांचे कारण जातपडताळणी दाखला 1961 चा पुरावा हा कोणत्याच समजबंधावा कडे मिळत नसल्या कारणाने सरकारी नोकरी पासून तरुणना वंचित राहावे लागत आहे ही गंबीर बाब आहे त्यासाठी संपूर्ण गोंधळी समाजाने एकत्र येणे काळाची गरज आहे असे श्री शशिकांत इंगळे यांनी समाजाला संभोधीले त्यावेळी उपस्थित, श्री मारुती माने, रामचंद्र इंगळे अशोक सूर्यवंशी,अनिल गोंधळी,विजय इंगळे,माणिकराज वाघमारे,राजू इंगळे, विश्वजित भिसे ,रुक्मिणी वास्टर,केदार गोंधळी, पंकज गोंधळी, अक्षय शिंदे, आदित्य इंगळे,नागेश सूर्यवंशी करण सूर्यवंशी,तसेच महिला व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते












