तुमची कल्पना, तुमची सजावट आणि आकर्षक बक्षिसे; गणेशभक्तांसाठी सुवर्णसंधी!

वेंगुर्ले शिवसेनेतर्फे घरगुती गणेश सजावट स्पर्धा.

वेंगुर्ले : गणेश चतुर्थीचे औचित्य साधून वेंगुर्ले शिवसेनेतर्फे शहर मर्यादित घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन तालुकाप्रमुख बाळा दळवी व शहरप्रमुख अजित राऊळ यांनी केले आहे.
स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांसाठी विशेष अटी-शर्तीचे बंधन घातलेले नाही. केवळ कलात्मकता आणि नवकल्पना आविष्कारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. विषयाचे कोणतेही बंधन नाही. चलत व स्थिर या दोन्ही प्रकारांतील सजावटींना स्पर्धेत सहभाग मिळेल. सहभागी होणारे कोणत्याही माध्यमांचा वापर करून सजावट करू शकतात. वैशिष्ट्यपूर्ण व सर्वोत्कृष्ट सजावटींना आकर्षक पारिताषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
विजेत्याला ७००० रु. उपविजेत्याला ५००० रु., तृतीय ३००० रु. व उत्तेजनार्थ दोन सजावटींसाठी प्रत्येकी १५०० रु., सर्वोत्कृष्ट गणेश मूर्ती सजावटीसाठी १५०० रु., उत्कृष्ट माटोळी सजावटीसाठी १५०० रु. तसेच चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुखाचा स्पर्धा परीक्षणावेळी शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. परीक्षण चौथ्या व सहाव्या दिवशी करण्यात येणार आहे. १२ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी व विहीत नमुन्यातील अर्ज भरून देणे अनिवार्य आहे. नावनोंदणीसाठी सत्यवान साटेलकर यांच्याशी संपर्क साधावा, असे (७७७००४३३३५) आवाहन सचिन वालावलकर, बाळा दळवी, अजित राऊळ यांनी केले आहे.