भराडी देवी जत्रोत्सवात RTO कडून रस्ता सुरक्षेचा अनोखा उपक्रम

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. जत्रोत्सवासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व शिस्तबद्ध व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला…








