कोकणशाही

कोकणशाही

📢 बारावी २०२६ निकाल जाहीर! २ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पहा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर,…

महामार्गावर भीषण अपघात: आईचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर

पालघरः तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगातील कारने माय-लेकांना जोरदार धडक दिल्याने आईचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट…

“ विधानपरिषदेच्या १० जागा, १० अर्ज — विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध!”

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका करताना सांगितले की, गोरगरीब, शोषित, दलित आणि दिव्यांगांसाठी शिवसेना नेहमीच पुढे…

उपजिल्हा रुग्णालय जागीच उभे राहणार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल – आ. दीपक केसरकर यांची मोठी घोषणा

 सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सध्याच्या जागेवरच आता अद्यावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाईल, असा महत्त्वपूर्ण दावा आमदार आणि माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. केसरकर म्हणाले की, जिल्ह्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची संकल्पना त्यांनीच आणली, मात्र राजघराण्यातील सदस्यांच्या स्वाक्षऱ्या वेळेत न मिळाल्याने…

प्रमोद जठार यांचा विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल; पालकमंत्री नितेश राणेंकडून अभिनंदन आणि शुभेच्छा

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला आहे. विधानभवन येथे हा अर्ज दाखल करताना राजकीय वातावरण उत्साहपूर्ण पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी श्री. प्रमोद जठार…

मच्छीमारांना दिलासा! डिझेल दरासह सर्व प्रश्नांवर सरकार सकारात्मक – पालकमंत्री नितेश राणे

महाराष्ट्र सरकारने मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देऊन या क्षेत्राच्या विकासासाठी मोठे पाऊल उचलले आहे. मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक असून, त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले…

हातेरी नदीचा नवजीवनाकडे प्रवास – गाळ उपशामुळे पुराचा धोका कमी!

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावाला दरवर्षी पावसाळ्यात हातेरी नदीच्या महापुराचा मोठा तडाखा बसतो. मात्र, यंदा पावसाळ्यापूर्वीच ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले असून, “नाम फाऊंडेशन”, “टाटा मोटर्स” आणि प्रशासनाच्या संयुक्त पुढाकारातून नदीतील गाळ उपसा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. या कामामुळे मुंबई-गोवा महामार्गालगतच्या…

“मान्सूनपूर्व सज्जता: २४ तास सतर्कतेचा इशारा – प्राजक्ता शिरवलकर”

कुडाळ : सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण विभागाने मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांनी २४ तास सतर्क रहावे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणांनी तातडीने त्या ठिकाणी पोचत नागरिकांना मदत मिळाली पाहीजे. कोणतीही हयगय होता…

कळसुलकर प्राथमिक शाळेचा प्रज्ञाशोधात झंझावात; १३ विद्यार्थ्यांनी पटकावली पदके

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘यशवंत प्रज्ञाशोध परीक्षेत’ शाळेच्या १३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विविध पदकांवर…

विरोधक-सत्ताधाऱ्यांच्या संघर्षात विकासाचा बळी!

  सावंतवाडी नगरपरिषदेतील सत्ताधारी व विरोधक यांच्यातील वाद आणि सत्ताधाऱ्यांमधील गटबाजीमुळे खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा येथील विकासकामे ठप्प पडल्याचा गंभीर आरोप ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांनी केला आहे.या भागातील कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारांना वर्क ऑर्डरही देण्यात आली…