सावंतवाडीच्या कायदा-सुव्यवस्थेला नवे बळ!; पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत

सावंतवाडी : पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम यांचे भाजपा राज्य युवा नेते विशाल परब तसेच यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज नाईक आणि माजी नगरसेवक राजू बेग यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सावंतवाडी शहर व तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखण्यासाठी नूतन पोलीस निरीक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्यात शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे यावेळी चर्चा करण्यात आली.

येत्या काळात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्सवी वातावरण असणार आहे. या काळात वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, कायदा-सुव्यवस्था तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून जबाबदारीपूर्वक नियोजन व आवश्यक त्या कायदेशीर उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी विनेश तावडे, केतन आजगावकर, विकास परब, ओंकार पावस्कर आदी उपस्थित होते.