सिंधुदुर्ग प्रतिनिधी २८
झाराप ग्रामपंचायत व सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षणसंस्था कसाल यांच्या सोजन्याने पंचक्रोशी गावातील दिव्यांग बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी झाराप सरपंच सौ. दक्षता दशरथ मेस्त्री, उपसरपंच श्री. मंगेश गावकर, ग्रामविकास अधिकारी श्री. बापूसाहेब फुंदे, पोलिस पाटील सौ. शमिका हरमलकर ,सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षणसंस्था कसाल यांचे अध्यक्ष श्री. शिंगाडे साहेब उपस्थित होते तर्सेबांबरडे, साळगाव, आकेरी, हुमरस, झाराप येथील दीव्यांग बांधवांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. विविध योजनांची माहिती देण्यात आली










