एस टी कर्मचा-याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ नेहमीच कार्यरत

कुडाळ प्रतिनिधी

एस टी कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ नेहमीच कार्यरत असणार असे प्रतिपादन रस्ता व वाहतूक सुरक्षा सप्ताहनिमित्त कुडाळ आगार वाहक, चालक व कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर रोटरी क्लब ऑफ कुडाळ,सुयश हाॅस्पिटल कुडाळ व राज्य परिवहन चे कुडाळ आगार यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रोटरीचे अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांनी केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो.डाॅ.संजय केसरे ,सचिव रो.राजीव पवार,रो.डाॅ.जयश्री केसरे ,रो.गजानन कांदळगावकर,रो.राजन बोभाटे,रो.शशिकांत चव्हाण ,रो.सचिन मदने,रो.एकनाथ पिंगुळकर,आगार व्यवस्थापक श्री रोहित नाईक,वाहतूक नियत्रंक श्री महादेव आंबोसकर ,सूयश हाॅस्पिटल चे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात कुडाळ आगारातील वाहक चालक व कर्मचारी यांची डोळे तपासणी,ईसीजी,रक्त व लघवी तपासणी,जनरल चेकअप करण्यात आले.