हुंडा प्रतिबंध कायद्यातील सुधारणा होण्यासाठी न्यायलयाने जनहित याचिका फेटाळली…

🖋️कोकणशाही ब्युरो न्यूज

“समाज बदलला पाहिजे, आपण काहीही करू शकत नाही,” असे निरीक्षण नोंदवत आज २७ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने हुंडा प्रतिबंधक कायद्यात ‘सुधारणा’ करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नियुक्त करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका फेटाळला आहे, हुंडा आणि घरगुती हिंसाचार कायद्यांचा गैरवापर थांबवावा. या कायद्यांतील तरतुदींचा आढावा घेण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नियुक्त करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाने “समाज बदलला पाहिजे, आपण काहीही करू शकत नाही,” असे निरीक्षण नोंदवत या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.