76वा प्रजासत्ताक दिनानिमित्त लष्करी सामर्थ्याबरोबर सांस्कृतिक विविधतेची झलक !

कोकणशाही ब्युरो न्यूज: दि.२६

आज भारत आपला 76वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींसह राज्य समारंभात सहभागी होण्यासाठी कर्तव्य मार्गावर आल्या आणि त्यांनी तिरंगा फडकावला. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले आहेत. आज, भारताच्या संस्कृतीचे आणि सैन्याच्या ताकदीचे सादरीकरण केले जात आहे, ‘ या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘फ्लाय पास्ट ज्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानांचे नेत्रदीपक प्रदर्शन पाहिले जाते. देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि प्रगत लष्करी क्षमतांचे एक अद्वितीय मिश्रण सादर केले गेले जे देशाच्या सामर्थ्याचे आणि अखंडतेचे प्रतिनिधित्व करते.