देवगड तालुक्यातील मोंड गावातील ग्रामस्थ मागण्यासंदर्भात देवगड पंचायत समिती कार्यालयासमोर जमले आहेत. पण पंचायत समिती प्रशासनाने प्रवेशद्वाराला टाळे लावले आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषणासाठी देवगड पंचायत समिती कार्यालयाबाहेर मोंड गावातील ग्रामस्थांवर ताटकळत उभ राहण्याची वेळ आली आहे. 26 जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण छेडणार असल्याचे पत्र प्रशासनाला अगोदर दिले असून प्रशासनाने प्रवेशद्वाराला टाळे का ठोकले? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.










